चंद्रपूर 24 एप्रिल (हिं.स.) – चिमूर विधानसभा क्षेत्राचे सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी (नलेश्वर) येथील माजी आमदार बाबुराव जसुजी वाघमारे यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.
बाबुराव वाघमारे यांनी १९९० मध्ये चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून निवडणूक लढविली. यावेळी ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. १९९० ते ९५ मध्ये ते या विधानसभा क्षेत्राचे पाच वर्ष सदस्य होते. या कालावधीत त्यांनी त्यांच्या क्षेत्रात विविध विकास कामे केलीत. उत्कृष्ठ आमदार म्हणून त्यांना गौरविण्यात आलेले आहे. आज, सोमवारी त्यांच्यावर मोहाळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात बराच मोठा परिवार आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply