अकोला, 23 मे(हिं.स.)पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना लावण्यात येणारी सीबील अट रद्द करण्याच्या मागणीसाठी 25 मे रोजी बार्शीटाकळी येथील तहसील कार्यालयावर शेतकरी जागर मंच च्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली. यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे, अक्षय राऊत आदी उपदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 मे रोजी झालेल्या खरीप हंगामाच्या बैठकीत जी बँक शेतकऱ्यांचा सीबील पाहून कर्ज देणार नाही अशा बँकांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र तरीही जिल्ह्यात शेतकऱ्यांना सीबीलची जाचक अट बँकांकडून लादली जात असल्याचा आरोप शेतकरी जागर मंचच्या वतीने करण्यात आला आहे. शेतकरी जागर मंचच्या वतीने मेरा गाव मेरी संसद हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अट रद्द करण्याच्या मागणीसाठी बार्शीटाकळी येथील तहसील कार्यालयावर 25 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply