अहमदनगर, 22 मार्च (हिं.स.):- नगर शहराची विकास कामांच्या माध्यमातून पायाभरणी सुरू आहे.नगरकरही मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या विकास कामांचे स्वागत करत आहे.नागरिकांचे विकासाचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून ते नियोजनबद्ध व कायमस्वरूपी सोडवण्यावर माझा भर आहे.मी फक्त विकास कामावरच बोलत असतो.या माध्यमातून आपल्या शहराचे उज्वल नाव देशपातळीवर घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू आहे.तरी प्रत्येकाने आपल्या शहरा चा अभिमान बाळगावा.टप्प्याटप्प्याने सर्वच विकासाचे प्रश्न मार्गी लागली जातील.भोसले आखाडा परिसरात नगरकरांच्या मालकीचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरू आहे.त्या माध्यमातून नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला जाईल.याचबरोबर विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण व्हावी यासाठी सारसनगर परिसरामध्ये क्रीडा संकुलाची निर्मिती होत आहे.शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत उपमहापौर गणेश भोसले यांनी खऱ्या अर्थाने विकास कामाच्या माध्यमातून पदाला न्याय देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग १४ मध्ये विनायकनगर येथे उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की,नगर शहराला विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व आपल्याला मिळालेले आहे ५० वर्षात कधीही न पाहिलेली विकास कामे शहरात सुरू आहे.पुढील काही महिन्यांमध्ये ही सर्व विकासाची कामे पूर्ण झालेली दिस तील.आमदार संग्राम जगताप यांनी उपमहापौर पदावर काम करण्याची संधी मला दिली त्या माध्यमातून प्रभागाच्या विकासाला गती दिली आहे.आपल्या प्रभागामध्ये क्रीडा संकुल,म्युझिकल फाउंटन व हॉस्पिटलची निर्मिती होत आहे बुरूडगाव रोड परिसर हे नगर शहराचे विकसित उपनगर म्हणून ओळखले जाणार आहे असे ते म्हणाले.
नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की,शहराच्या विकासाच्या प्रश्नाबरोबर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे प्रयत्न सुरू आहे.कोरोना संकट काळामध्ये त्यांनी आरोग्य सेवेचे केलेले कार्य कौतुकास्पद आहे.त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता संकट काळामध्ये प्रत्येकाच्या हाकेला धावून जात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे असे ते म्हणाले.मनपा महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती मीनाताई चोपडा यांनी प्रास्ताविक केले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply