नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-फित्रच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “ईद-उल-फित्रच्या शुभ मुहूर्तावर, मी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना , विशेषत: आपल्या मुस्लिम बंधू- भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते.
रमजानच्या पवित्र महिना समाप्तीला साजरा केला जाणारा ईद हा सण प्रेम, करुणा आणि स्नेह भावनांचा प्रसार करतो. ईद आपल्याला एकता आणि परस्पर सौहार्दाचा संदेश देते. हा सण समरसतेच्या भावनेने ओतप्रोत असून शांततापूर्ण आणि समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतो.
यानिमित्ताने समाजात बंधुभाव आणि सौहार्द वृद्धिंगत करण्याचा संकल्प करूया.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply