सोलापूर 22 मार्च (हिं.स) : मतदार संघातील गाव विकासासाठी मी कधीही पक्षभेद करीत नाही, करणार नाही. तालुक्याच्या विकास निधीसाठी मी नेहमी कटिबद्ध आहे. विकासाच्या बाबतीत सांगोला तालुक्याची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली.
सांगोला मतदारसंघातील दलित वस्ती विकास कामांसाठी ५ कोटी ५८ लाख रुपये मंजूर झाली असल्याची माहिती देताना आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, दुष्काळी तालुक्याची ओळख मी या पाच वर्षात पुसून काढणार आहे. सर्व समाज घटकांच्या विकासासाठी मी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात मी निधी आणला असून यापुढेही विकास निधीसाठी प्रयत्न करीतच राहणार आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply