अहमदनगर, 22 मार्च (हिं.स.):- महानगरपालिकेच्या माध्यमातून बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलने महिलांसाठी आरोग्य सुविधा देऊन नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.गेल्या अनेक वर्षापासून देशपांडे हॉस्पिटलने गोर गरीब रुग्णांसाठी आरोग्य सुविधा दिल्या आहे.केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना थेट रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते.जिल्हाभरातून महिला प्रसुतीसाठी मोठ्या संख्येने येत आहे.त्यांच्या आरोग्याची व नवजात बालकाची काळजी घेतली जाते.बाळासाहेब देशपांडे रुग्णालयामधील डॉक्टर्स,नर्स व कर्मचारी हे नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरवत आहे.सुदृढ व निरोगी पिढी निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे.उद्या च्या भारताचे उज्वल भविष्य या बालकांच्या हातामध्ये आहे.बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलने आत्तापर्यंत केलेली आरोग्य सेवा ही कौतुकास्पद आहे.या ठिकाणी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहे.त्याचा नागरिक मोठ्या संख्येने लाभ घेत आहे.महिला व बालकल्याण समितीच्या वतीने नवजात बालकांसाठी बेबी किटचे वाटप करण्यात आले आहे.सभापती पुष्पा बोरुडे व उपसभापती मीना चोपडा यांनी राबविलेला उपक्रम कौतुका स्पद असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
मनपा महिला बालकल्याण समितीच्या वतीने बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल येथे नवजात बालकांना बेबी किटचे वाटप करताना महापौर रोहिणी शेंडगे,सभापती पुष्पा बोरुडे,उपसभापती मीना चोपडा,उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर,डॉ.नरसिंह पैठणकर आदी उपस्थित होते.
सभापती पुष्पा बोरुडे म्हणाल्या की,बाळासाहेब देशपांडे रुग्णालयामध्ये जन्मलेल्या नवजात बालकाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मनपा महिला बालकल्याण समितीच्या वतीने बेबी किटचे वाटप करण्यात आले आहे.डॉ.सतीश राजूरकर व त्यांची टीम बाळासाहेब देशपांडे रुग्णालयामध्ये आरोग्याच्या चांगल्या सुविधा देत आहे.या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील महिला प्रसूतीसाठी मोठ्या संख्येने येत असतात त्यांना व त्यांच्या बालकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनपा महिला बालकल्याण समिती कटिबद्ध आहे,असे त्या म्हणाल्या.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply