Home राजकारण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४-२५ मे मुंबई दौऱ्यावर

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४-२५ मे मुंबई दौऱ्यावर

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४-२५ मे मुंबई दौऱ्यावर

* उद्धव ठाकरे व शरद पवार यांची घेणार भेट

मुंबई, 21 मे (हिं.स.) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारण तसेच भाजपने इतर पक्षांची केलेली कोंडी हे सर्व लक्षात घेऊन केजरीवाल बुधवार, २४ मे रोजी उद्धव ठाकरे यांची, तसेच गुरुवार, २५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

प्रामाणिक राज्य सरकारला सत्तेच्या चाव्या हातात मिळाल्या म्हणून केंद्र सरकार त्रास देत आहे. दिल्लीतील सत्ताधारी राज्य सरकारला काम करून न देता सतत त्रास देण्याचा कट भाजपा आणि मोदी संचालित केंद्र सरकार रचत आहे. त्यामुळे मोदी आणि भाजपा संचालित केंद्र सरकारला पराभूत करण्याकरिता देशातील सर्व पक्षांनी एकत्रित यायला हवे आणि या करिता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीच्या संयोजक अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर असून महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेणार आहेत.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.