नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.) : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टरबाजी करण्यात आलीय. याप्रकरणी पोलिसांनी 100 हून अधिक एफआयआर नोंदवले असून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिल्लीचे राजकारण करणाऱ्या एक पक्ष या पोस्टरबाजीत असल्याची माहिती पुढे आलीय.
दिल्ली शहराच्या विविध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यात “मोदी हटाओ देश बचाओ” अशी आक्षेपार्ह शेरेबाजी करण्यात आलीय. पोस्टर बनवल्यावर त्या पोस्टरवर छापखान्याचा नंबर दिला जातो. मात्र या पोस्टरवर कोणताही नंबर दिलेला नाही. परंतु, या पोस्टरवर लिहीलेल्या मजकुराचे मॅटर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी बुधवारी सकाळी ट्विट केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले असून चौकशीत त्यांनी दिल्लीतील एका राजकीय पक्षाचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत सध्या 100 ठिकाणी पोस्टर्स लागले आहेत. परंतु, राजकीय पक्षाने 5 हजार पोस्टर्स छापल्याची माहिती पुढे आली असून पोलिस त्यानुषंगाने तपास करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply