माझा विनायक मेटे करण्याचा प्रयत्न होतोय – अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात माझा विनायक मेटे करण्याचा प्रयत्न होतोय, असा खळबळजनक आरोप केलाय.
माझ्यावर कोणीतरी पाळत ठेवतंय, मी कुठं जातोय, कोणाला भेटतोय, याची माहिती घेतली जातेय. यासंदर्भात नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना भेटून तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
चव्हाण यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचा गंभीर आरोप केला असला तरीही त्यामागचे सूत्रधार कोण? हे स्पष्ट केलेलं नाही. पोलिसांनीच त्याचा शोध घ्यावा, असं त्यांनी म्हटलंय.
मराठा समाजाच्या विरोधात माझी भूमिका असल्याचे दाखवण्यासाठी माझी सही व शिक्का असलेले कितीतरी बोगस लेटरपॅड तयार केले जात आहेत, असंही चव्हाण म्हणाले.
यावरून अशोक चव्हाण यांचा विनायक मेटे करण्याचा प्रयत्न त्यांच्या काँग्रेस पक्षातील हितशत्रू करीत आहेत की अन्य पक्षातील विरोधक असा प्रश्न निर्माण झालाय.
माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी अशाप्रकारचा गंभीर आरोप केल्यानं पोलीस प्रशासन खडबडून जागं झालंय. चव्हाण यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या सुत्रधाराचा पोलीस शोध घेत आहेत.
एकेकाळी केंद्र आणि राज्यातील सत्तेवर मजबूत पकड असलेल्या काँग्रेस पक्षाची सध्या दयनीय अवस्था आहे. काँग्रेस पक्ष नेत्यांच्या गटातटात विखुरला असून नेतृत्वामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ गट नेतेपदाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील अंतर्गत संघर्ष नुकताच उफाळून आला होता.
त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवण्यामागे मराठा समाजाचे नेतृत्व कोणी करायचे हा वाद कारणीभूत आहे की त्यामागे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अथवा कोणी इतर राजकीय विरोधक जबाबदार, हे पोलीस तपासातून पुढे येणार आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी त्यांचा विनायक मेटे केला जात असल्याच्या आरोपाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतलीयं. काय म्हणालेत, मुख्यमंत्री ते बघूयात…व्हिडीओ
अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, आपली प्रतिक्रिया नोंदवा.
Former Chief Minister and senior Congress leader Ashok Chavan has alleged that there is an attempt to destroy him and his image by someone who is monitoring his movements and activities. Chavan filed a complaint with the Superintendent of Police in Nanded and claimed that there were bogus letterheads with his signature and stamp circulating against him. The reasons behind the alleged surveillance are unknown, and police investigations are ongoing.
Leave a Reply