Home राजकारण मतदानानंतर शाई ऐवजी लेझरचा वापर करणार

मतदानानंतर शाई ऐवजी लेझरचा वापर करणार

मतदानानंतर शाई ऐवजी लेझरचा वापर करणार

निवडणूक आयोग वापरणार नवे तंत्रज्ञान

नवी दिल्ली, 21 मे (हिं.स.) : निवडणुकीत होणाऱ्या अवैध मतदानाला प्रतिबंध लावण्यासाठी निवडणूक आयोग नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझरचा वापर केला जाणार आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार लेझरने केलेली खूण अनेक दिवस काढणे जवळपास अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. तसेच ईव्हीएममध्ये एक कॅमेराही बसवण्यात येणार आहे, जो मतदाराचा फोटो टिपेल या वर्षी होणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते. त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. लेझर तंत्रज्ञानामुळे बोगस मतदान थांबेल. कारण, लेझर स्पॉट केल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा मतदानासाठी आली तर त्याला पकडले जाईल. दुसरीकडे, ईव्हीएममध्ये बसवण्यात आलेला कॅमेरा आर्टिफिशिअल इंटेलिजन्टस तंत्रज्ञानाने पुन्हा मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीची ओळख करून निवडणूक अधिकाऱ्याला अलर्ट पाठवेल.नवीन वर्षात 10 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होतील. यामध्ये लोकसभेच्या 122 जागांचा समावेश आहे, जे एकूण जागांच्या सुमारे 22 टक्के आहे. याव्यतिरिक्त, सर्वोच्च न्यायालयाने अशा 8 याचिकांवर निर्णय घ्यायचा आहे, ज्याचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.

हिंदुस्थान समाचारा

Leave a Reply

Your email address will not be published.