सोलापूर 20 मे (हिं.स) भा जपचे (BJP) सोलापूरचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या महिलेने विषारी वनस्पतीच्या बिया खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तिने ‘श्रीकांत देशमुख, मला तुम्हाला शेवटचं बोलायचं आहे…’ असे म्हणत एक व्हिडिओही व्हायरल केला आहे. त्या महिलेवर प्रथम सांगोल्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले व पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपच्या नेत्यांची नावे घेऊन बदनामी करते म्हणून सांगोल्यातील एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने संबंधित महिलेच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित महिला आज श्रीकांत देशमुख यांच्या जवळा (ता. सांगोला) येथील घरी गेली होती. संबंधित महिलेने विषारी बिया खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply