वाराणसी, 20 एप्रिल (हिं.स.) : जी-20 सदस्य देशांच्या मुख्य कृषी शास्त्रज्ञांची ‘निरोगी लोक आणि सुदृढ पृथ्वीसाठी शाश्वत कृषी आणि अन्नव्यवस्था’ या विषयावरील बैठकीची बुधवारी वाराणसी इथे यशस्वी सांगता झाली.
केंद्रीय नागरी हवामान आणि रस्ते वाहतूक तसेच महामार्ग राज्यमंत्री जनरल डॉ. वी. के. सिंह यांच्या हस्ते सोमवारी (17 एप्रिल) या बैठकीचे उद्घाटन झाले होते. जी-20 सदस्य देशांमधील सुमारे 80 प्रतिनिधी, निमंत्रित देशांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेतला होता.
डीएआरईचे सचिव आणि आयसीएआरचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी तीन दिवस (17-19 एप्रिल 2023) बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.
या बैठकीतील चर्चेत, कृषी-अन्न व्यवस्थेत बदल करण्यासाठी नवोन्मेष आणि तंत्रज्ञानविषयक सुविधा, अन्न सुरक्षा आणि पोषण मिळवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक पुढाकार, पिकांचे पौष्टिक मूल्य वाढविण्यासाठी अन्न पिकांमध्ये जैविक दृष्ट्या सुदृढ बनवणे, पोषण आणि नील क्रांतीच्या वाढीसाठी उष्णकटिबंधीय प्रदेशात समुद्री शैवाळ शेती, भरड आणि इतर प्राचीन धान्यासाठी आंतरराष्ट्रीय संशोधन उपक्रम (MAHARISHI), ‘एक आरोग्य’ या तत्वाअंतर्गत एकात्मिक आणि एकत्रित दृष्टिकोन, सीमेपलीकडून येणाऱ्या टोळधाडीसारख्या कीटक आणि रोगांसाठी भागीदारी आणि समन्वयीत धोरणे, संकटात तग धरू शकणाऱ्या कृषी-अन्न प्रणालींसाठी संशोधन आणि विकासाचे प्राधान्यक्रम, हवामानबदलाच्या संकटाचा सामना करू शकणारे तंत्रज्ञान आणि शाश्वत कृषी-अन्न प्रणालींसाठी नवकल्पना, निसर्ग-पूरक शेती: लवचिक कृषी-अन्न प्रणाली तयार करण्यासाठी विज्ञान आणि नवकल्पना, जैविक नायट्रिफिकेशन इनहिबिशन (BNI): हरित गृह उत्सर्जन कमी करणे आणि पिकांचे उत्पन्न वाढवणे यावरही बैठकांमध्ये चर्चा झाली.
डिजिटल कृषी आणि माग घेण्याची क्षमता, पिकांचे नुकसान आणि पीक वाया जाणे कमी करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान उपाय, कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप व्यवस्था, बहुआयामी कृषी विस्तार आणि सल्लागार सेवा (ईएएस): प्रयोगशाळा ते जमीन आणि बाजारात माल पोहोचवणे, अल्पभूधारक आणि कौटुंबिक शेती सुधारण्यासाठी भागीदारी: जी 20- ग्लोबल साउथ कोऑपरेशन कृषी-संशोधन आणि विकास, सार्वजनिक वस्तूंसाठी सार्वजनिक-खाजगी कृषी- संशोधन आणि विकास: नवोन्मेष निर्मितीला चालना देत गतिमान करण्याचा अनुभव, हे ही चर्चेचे विषय होते.
या बैठकीत अन्न सुरक्षा आणि पोषण, डिजिटल शेती, संकटात टिकून राहणारी लवचिक कृषी अन्न प्रणाली आणि कृषी संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात सार्वजनिक खाजगी भागीदारी यासाठी कृषी संशोधन आणि विकासातील सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारे अध्यक्षीय सारांश किंवा फलश्रुतीचे दस्तऐवज स्वीकारण्यात आले. एमएसीएस 2023 ने MAHARISHI ची सुरुवात करण्यास पाठिंबा दिला, यात खालील गोष्टींचा समावेश असेल.
संशोधनविषयक निष्कर्षांचा प्रसार वाढविण्यासाठी आणि संशोधनातील अंतर आणि गरजा ओळखण्यासाठी ओळखलेल्या धान्य पिकांवर काम करणाऱ्या संशोधक आणि संस्थांना जोडण्यासाठी यंत्रणा स्थापन करणे.
संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षांचा प्रसार वाढविण्यासाठी आणि संशोधक आणि निश्चित धान्य पिकांवर काम करणाऱ्या संस्थांना जोडण्यासाठी यंत्रणा स्थापन करणे.
संशोधकांना जोडणे, डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी, संशोधन आणि माहितीच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी संपर्कविषयक साधने आणि संकल्पनेवर आधारित वेब प्लॅटफॉर्मची स्थापना करणे.
क्षमता बांधणीविषयक उपक्रम आयोजित करणे तसेच आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आणि परिषदांचे आयोजन करणे.
कामगिरीकडे विशेष लक्ष आणि वैज्ञानिकांच्या कार्याची दखल.
ICRISAT, एक CGIAR केंद्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या तांत्रिक सहाय्याने महर्षी सचिवालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च (IIMR), हैदराबाद इथं स्थापन केले जाईल.
जी- 20 बैठकीच्या दरम्यान, भारताच्या कृषी संशोधनात भविष्यातील सहकार्यासाठी फ्रान्स, इंग्लंड, अर्जेंटिना आणि जर्मनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकाही झाल्या.
इटलीतील रोम इथल्या अन्न आणि कृषीविषयक संस्थासोबत द्विपक्षीय बैठकही झाली. या बैठकीमध्ये कृषी शेतकरी संघटना आणि आयसीएआय च्या कृषी विकास केंद्रांमार्फत विस्तार सेवा मजबूत करण्यासाठी सहयोग विकसित करू शकतात, यावर डॉ. पाठक यांनी यावर भर दिला . डॉ. एफएओचे मुख्य शास्त्रज्ञ इशमाहाने इलोआफी यांनीही विस्तार सेवेत सहकार्य करण्याविषयी उत्सुकता व्यक्त केली.एफएओचे वरिष्ठ कृषी अधिकारी डॉ. सेल्वाराजू रामासामी हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते.
भारत-जर्मनी यांच्यात झालेल्या द्वीपक्षीय बैठकीत,विशेषत: सार्क प्रदेशातील अन्न वाया जाणे आणि पिकांचे नुकसान थांबवण्यासाठीच्या उपायांवर चर्चा झाली.
वाराणसी येथे येणार्या परदेशी प्रतिनिधींना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा घेता यावा, याचीही सरकारने व्यवस्था केली होती. जगभरातील विकसित आणि विकसनशील देशांतून वाराणसी येथे आलेल्या प्रतिनिधींच्या प्रवास आणि पर्यटनासाठी, त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी तसेच सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक लोकांचे प्रदर्शन करण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने अतिशय व्यापक आणि भव्य व्यवस्था केली आहे.
बैठकीदरम्यान, गंगा आरतीचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रतिनिधींना क्रूझ राईडवरही नेण्यात आले आणि त्यानंतर ताज गंगेवर स्वागताची मेजवानी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रतिनिधींना सारनाथलाही नेण्यात आले. त्यांच्यासाठी भारतीय पुरातत्व संस्थेचे वास्तू संग्रहालय आणि बौद्ध स्तूपाचा दौरा आयोजित करण्यात आला होता, तसेच लाइट अँड साउंड शोचा ही त्यांनी आनंद घेतला. त्यानंतर बुद्ध थीम पार्कच्या शांत परिसरात प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिनिधींनी आज व्यापार सुविधा केंद्राला भेट दिली आणि वाराणसी शहराच्या वस्त्रोद्योग इतिहासाची झलक पाहिली. तसेच स्थानिक कारागिरांची भेट आणि पारंपरिक उत्पादने बनवण्याचे प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात आले होते. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि राज्य कृषी विभाग, IRRI-SARC या NDDB, अपेडा सारख्या संस्थांचे एक छोटेसे प्रदर्शनही व्यापार सुविधा केंद्रात आयोजित करण्यात आले होते. प्रतिनिधींना कार्यक्रमस्थळी भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. त्यानंतर त्यांच्यासाठी मेजवानी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीचे अध्यक्ष, डॉ. हिमांशु पाठक यांनी सर्व प्रतिनिधींचे आभार मानत, पुढच्या वर्षीचे अध्यक्षपद ब्राझिलकडे सूपूर्द केले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply