‘सौदी अरेबियामध्ये मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध, सेक्युलर भारतात कधी ?’ या विषयावर विशेष संवाद !
मुंबई, 20 मार्च (हिं.स.) : सौदी अरेबियामध्ये रमजानच्या महिन्यात मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध केला आहे. मोठ्या आवाजात लावण्यात आलेल्या भोंग्यामुळे होणारे त्रास कट्टर मुसलमान देशांनाही आता लक्षात येत आहेत. पर्यावरण, तसेच शास्त्रीय दृष्टीने तेही विचार करत आहेत. भारतात जेव्हा मशिदींवरील भोंग्यांवर बंदी करण्याची मागणी होते, तेव्हा मुल्ला-मौलवी आणि मुसलमान नेते ऐकत नाहीत. आम्ही 20 प्रतिशत भारतातील 80 प्रतिशत लोकसंख्येवर प्रभुत्व गाजवत आहोत, हे दाखवायचा प्रयत्न केला जात आहे ! अजान इतरांना भोंग्यांद्वारे ऐकवावी, असे इस्लामच्या कुठल्या ग्रंथात लिहिले आहे ? 90 डेसिबलच्या वर कुठल्याही भोंग्याचा आवाज असू नये; मात्र अनेक मशिदींवरील भोंग्यांचा आवाज हा 120 ते 130 डेसीबलच्याही वर असतो, जो लोकांना बहिरेपणा आणू शकतो. भारतातील सर्व मशिदींवरील भोंग्यांवर केवळ प्रतिबंध नाही, तर त्यावर बंदी घालावी, अशी मागणी दिल्ली येथील मेजर (निवृत्त) तथा लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. सरस त्रिपाठी यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सौदी अरेबियामध्ये रमजानच्या महिन्यात मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध, सेक्युलर भारतात कधी ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.
या वेळी चर्चेत सहभागी झालेले ‘सर्वोच्च न्यायालया’चे अधिवक्ता उमेश शर्मा म्हणाले की, जे इस्लामचे केंद्र मानले जाते, तिथून मशिदीवरील भोंग्यांना प्रतिबंध केला आहे आणि अन्य नियमही लागू केले आहेत. मग भारतात हे का लागू नाही ? दिवसांतून 5 वेळा मोठ्या भोंग्यांद्वारे अजान ऐकतांना अनेकांना त्याचा त्रास होतो. लोकांची झोपमोड होते, हिंदू त्या वेळी पूजापाठ किंवा अन्य कामे करतांना त्यात व्यत्यय येतो, अन्य धर्मीयांनाही याचा त्रास हा होतोच ! संविधानानुसार सर्व धर्म-पंथ सारखे आहेत. अजान ही मुसलमानांसाठी आहे, मग इतरांना ऐकवण्यासाठी जो प्रयत्न केला जात आहे, तो त्या त्या ठिकाणच्या सरकारने थांबवला पाहिजे. भारत सरकारने मशिदींवरील भोंग्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सुद्धा याविषयी पुढाकार घ्यावा.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply