Home राजकारण बंडखोर राहुल कलाटेंमुळे अखेर चिंचवडमध्ये तिहेरी लढत

बंडखोर राहुल कलाटेंमुळे अखेर चिंचवडमध्ये तिहेरी लढत

बंडखोर राहुल कलाटेंमुळे अखेर चिंचवडमध्ये तिहेरी लढत

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्याविरोधात बंडखोरी करणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी आज अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत रंगणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी कलाटे यांची मनधरणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, कलाटे यांचे मन वळविण्यात त्यांना अपयश आले. सचिन अहिर यांनी कलाटे यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे करून दिले. मात्र, कलाटे यांनी आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगून वेळ मारून नेली. दुपारी 3 वाजता अर्ज मागे घेण्याची वेळ संपायला आली असतानाही कलाटे यांनी माघार घेतली नाही. कलाटे यांनी आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करूनच हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीकडून तिकीट मिळालेले राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे निवडून आले तर पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून या मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो, अशी भीती कलाटेंना होती त्यामुळे त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठीच उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात २०१९ ला राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून सर्व पक्षांचा पाठिंबा मिळून कलाटे यांनी सुमारे एक लाख १३ हजार मते मिळवली होती. तेव्हापासून कलाटेंचे या मतदारसंघातील वजन वाढले आहे. दुसरं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षाची ताकद शहरात क्षीण झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मोठी ताकद म्हणून कलाटेंकडे बघितले जात. शिवसेनेच शहरातील अस्तित्व आणि कलाटेंनी व्यक्तिगत ताकद कमी होणे शिवसेनेला परवडणार नाही. त्यामुळे शिवसेनेकडून देखील कलाटेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी फारसा आग्रह केला गेला नसावा, असंही बोललं जात आहे.

Rebel candidate Rahul Kalate will continue to run as an independent in the Chinchwad assembly constituency by-election, despite efforts by senior NCP and Shiv Sena leaders to persuade him to withdraw his candidacy. The decision is seen as an attempt by Kalate to show his political strength and increase his personal standing in the city of Pimpri-Chinchwad.

Leave a Reply

Your email address will not be published.