Home राजकारण निवृत्त न्यायमूर्ती नाझीर यांना आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदाचे “गिफ्ट”?

निवृत्त न्यायमूर्ती नाझीर यांना आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदाचे “गिफ्ट”?

निवृत्त न्यायमूर्ती नाझीर यांना आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदाचे “गिफ्ट”?

निवृत्त न्यायमूर्ती नाझीर यांना मोदींकडून राज्यपालपदाचे बक्षीस? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच काही राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती केली. या नियुक्तीमध्ये सर्वोच्च न्यायालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले न्यायमूर्ती एस. अब्दुल नाझीर यांचाही समावेश आहे. नाझीर यांनी त्यांच्या कार्यकाळात अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसह नोटबंदी वैधता, खासगी अधिकार, तिहेरी तलाक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासारख्या महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये निकाल दिले आहेत. मोदी सरकारने त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राज्यपालपदाचे बक्षीस दिलेले आहे. नाझीर यांची राज्यपालपदी वर्णी लागल्यामुळे भाजप विरोधकांसह राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाझीर यांच्याकडे आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवून नरेंद्र मोदी यांनी दक्षिणेकडील राज्यात आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे बोलले जात आहे.

Retired Justice Nazir Awarded Governorship by Modi?

President Draupadi Murmu has appointed Abdul Nazir, a former judge who recently retired from the Supreme Court and who has delivered judgments in important cases, as the Governor of Andhra Pradesh. The appointment has raised questions in politics, with some viewing it as an attempt by the Modi government to establish its influence on the southern state.

Leave a Reply

Your email address will not be published.