नाशिक, १८ मे (हिं.स.) : त्रंबकेश्वर येथे झालेल्या प्रकारानंतर नेत्यांच्या भेटी या सुरूच असून गुरुवारी काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन राज्य सरकारला काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान या वादामध्ये आता साधु महंतांनी देखील उडी घेतली असून महंत अनिकेत शास्त्री यांनी मशिदीत हनुमान चालीसी म्हणायला परवानगी द्या अशी मागणी केली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुरू असलेल्या मुस्लिम युवकांच्या प्रवेशाचा वाद हा भेटतच असून या वादात आता साधू महंतांनी देखील उडी घेतली असून या सर्व प्रकारावरती गुरुवारी महंत अनिकेत शास्त्री महाराजांनी म्हटले आहे की आता आम्हाला मशिदीमध्ये जाऊन हनुमान चालीसा म्हणायला परवानगी द्या आतापर्यंत जी नोटंकी चालू होती ती बंद करा अन्यथा आम्हालाही तसे उत्तर द्यावे लागेल असा इशारा दिला आहे.
दरम्यान या सगळ्या प्रकरणावर ती राज्य सरकारने तपासाचे आदेश दिले असताना गुरुवारी काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी सायंकाळच्या सुमारास त्रंबकेश्वर मध्ये येऊन उत्तर दरवाज्याच्या ठिकाणी जाऊन त्रंबकेश्वर महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की फडणवीस यांनी या प्रकरणाची नक्कीच चौकशी केली पाहिजे परंतु ज्या संस्था आरडाओरडा करत आहे त्यांची देखील चौकशी करा त्यांना फड कोण देतो ते काय शिकवतात यावर देखील फडणवीस यांनी बोलले पाहिजे चर्चा केली पाहिजे म्हणजे कोण खरे कोण खोटे हे सर्वांसमोर येईल मोर्चे काढून विनाकारण एका समाजाला बदनाम करण्याचे कटकारस्थानचे रचले जात आहे ते चुकीचे आहे असा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply