Home राजकारण मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई, 16 मे (हिं.स.) : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी (16 मे) यशस्वी चाचणी देखील आली. सध्या मुंबई ते शिर्डी धावणाऱ्या गाडीचा वापर चाचणीसाठी करण्यात आला.

मुंबईहून पहाटे 5.35 वाजता गोव्याच्या दिशेने वंदे भारत एक्सप्रेस रवाना झाली. 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून सुटली, ही गाडी गोव्यातील मडगावला दुपारी 2.30 दरम्यान पोहोचली. वंदे भारत एक्सप्रेसला मिळणारा प्रतिसाद पाहून मुंबई-गोवा मार्गावर देखील ही एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.मुंबईहून सुटणाऱ्या वंदे भारतचा हा चौथा मार्ग असणार आहे. यापूर्वी मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. या मार्गांवर मिळालेला चांगल्या प्रतिसादानंतर मुंबई-गोवा मार्गावर देखील ही एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे. कोकणवासियांनी या नव्या कोऱ्या गाडीचा फायदा होणार आहे. नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकणवासियांचा प्रवास देखील आरामदायी होणार आहे. मुंबईतून सुटणारी ही चौथी वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे. यापूर्वी मुंबई सीएसएमटी-अहमदाबाद-गांधीनगर, मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी, मुंबई सीएसएमटी-सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. आता मुंबई सीएसएमटी ते गोवा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसची मुंबई-गोवा मार्गावरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे, लवकरच मुंबई सीएसएमटी-मडगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.