अमरावती, 16 मे (हिं.स.) : अमरावतीत जातीय दंगल घडवण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी काँग्रेसने केलीय. यासंदर्भात काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आलेय.
काँग्रेसच्या निवेदनानुसार अमरावती शहर तसेही जातिय दंगलीच्या दृष्टीकोनातून राज्यातील संवेदनशिल शहरामध्ये मोडतं आणि जिथे जातिय दंगली घडतात त्याठिकाणीं व्यापार,रोजगार,जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनाची सुरक्षा,शहरातील व्यापार,उद्योग यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे.नुकतेच काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “राज्यात दंगली घडवणाऱ्यांना अद्दल घडवू” व त्यांची कोणतीही गय केल्या जाणार नाही अश्या प्रकारचे भाष्य पुणे येथील पत्रकार परिषदेमध्ये केले होते .सोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंगलितील दोषींवर कठोर कारवाई केल्या जाईल अश्या प्रकारचें निवेदन प्रस्तुत करून राज्यातील जनतेला एका प्रकारचा संदेश दिलेला आहे.सोशल मीडियावर अश्या प्रकारचा प्रयास करण्याऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई केल्या जावी अशी आमची मागणी आहे. उपरोक्त प्रकरणामध्ये पुन्हा तपास करून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करावी व संपूर्ण प्रकरणाचा अंतिम शोध घ्यावा अशी आम्ही आपणास मागणी करत आहोत.याप्रसंगी काँग्रेसचे माजी आमदार डॉ.सुनील देशमुख,शहर अध्यक्ष बबलू शेखावत,माजी महापौर विलास इंगोले,मिलींद चिमोटे भेय्या पवार,शोभा शिंदे,जयश्री वानखडे,योगिता गिरासे,रवींद्र शिंदे,निलेश गुहे,पंकज मांडळे,वैभव देशमुख,विजय खंडारे उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply