वर्धा, 15 मे (हिं.स.) : युवकांमध्ये अनेक कलागुण असतात परंतु या गुणांचे सादरीकरण करण्याची संधी त्यांना मिळत नाही. नेहरू युवा केंद्राच्यावतीने वतीने आयोजित जिल्हा युवा महोत्सव युवकांच्या कलागुणांना वाव मिळवून देणारे व्यासपिठ आहे, असे प्रतिपादन खा.रामदास तडस यांनी केले.
नेहरू युवा केंच्यावतीने न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या सहयोगाने आयोजित जिल्हा युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे न्यु आर्ट कॉलेजचे सचिव डॉ. अभिजीत वेरुळकर, प्राचार्य डॉ. ए.व्ही. ससनकर, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, राज्य युवा पुरस्कारार्थी सारंग रघाटाटे आदी उपस्थित होते.
महोत्सवात दुपारी सांस्कृतिक युवा महोत्सवाचे उद्घाटन आमदार डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रामदास आंबटकर उपस्थित होते. आ.आंबटकर यांनी युवकांना संबोधित केले. आ.डॉ.भोयर यांनी युवकांसाठी शासनाने व्यासपिठ निर्माण करुन दिले आहे. या व्यासपिठावरून भाषण देण्याची कला अवगत केली तर तो युवक कुठेही मागे राहणार नाही. याचे चांगले उदाहरण आपण स्वत: असल्याचे सांगितले. सकाळच्या सत्रात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसिलदार रमेश कोळपे यांच्याहस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिला युवा अधिकारी शिवधन शर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सतिश इंगोले यांनी केले. या महोत्सवात विविध शासकीय कार्यालयांच्यावतीने स्टॅाल लावण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय निवडणुक शाखेच्यावतीने मतदार नोदणी अभियान कक्ष, बँक ऑफ इंडीयाने स्वयंरोजगार प्रशिक्षण मार्गदर्शन केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळाने पंतप्रधान स्वयंरोजगार योजना व पंडीत दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास व अन्य विभागाचे स्टॉल व प्रदर्शनी लावण्यात आली होती.
स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते बक्षिसे देण्यात आली. त्यात कविता, लेखन पहिले पारितोषिक बादल जोगे, द्वितीय मधुर येसरकर, तृतीय पारितोषिक संकेत हांडे यांना देण्यात आले. युवाचित्रकला, कलाकृती स्पर्धेचे पहिले पारितोषिक वेदांत तिमांडे, द्वितीय साक्षी भालेराव, तृतीय कल्याणी गावंडे यांना, छायाचित्रण स्पर्धा पहिले पारितोषिक जान्हवी देशमुख, द्वितीय विशाखा कामडी, तृतीय श्रीकांत राऊत यांना देण्यात आले.
भाषण स्पर्धा पहिले पारितोषिक साहील दरणे, द्वितीय माहेश्वरी गिरडे, तृतीय पारितोषिक यश देशमुख यांना देण्यात आले. सांस्कृतिक महोत्सव पहिले पारितोषिक चंद्रशेखर अँड ग्रुप, द्वितीय मयुरी अँड ग्रुप, तिसरे पारितोषिक समीर अँड ग्रूप यांना मिळाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सीमा मुळे, विकास फटींगे, स्मिता देवाल, भास्कर पाटील, रुपाली भैदरकर, राहुल लाखे, राहुल तेलरांधे, प्रीती वाडीभस्मे, तेजस भातकुलकर, विजय अढाऊ, पंकज वंजारी, विनेश काकडे, शेख हासमी, संजय सावरकर आदींनी काम पाहीले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply