चंद्रपूर 15 मे (हिं.स.) – देशातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक ,गृहिणी व सर्व सामान्यांना महागाईच्या खाईत लुटणाऱ्या भाजपा सरकारला आता उतरती कळा लागली असून कर्नाटक राज्याच्या निवडणुकीच्या निकालातून ते पुढे आले.तर गेल्या दहा वर्षापासून सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस प्रणित शेतकरी परिवर्तन सहकार आघाडी पॅनलला निवडून देत भाजपा प्रणित पॅनलचा पराभव केला. काँग्रेस प्रणित विजयी पॅनल मध्ये युवा नेतृत्वाचा भरणा व व ज्येष्ठांच्या अनुभवाची सांगड असल्याने परिवर्तनातून मतदारांनी युवा नेतृत्वाला दिलेली सेवेची संधी सार्थक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते सिंदेवाही येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार व नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून बोलत होते.
याप्रसंगी पुढे बोलताना माजी मंत्री आ.वडेट्टीवार म्हणाले की, 2008 मध्ये राज्यमंत्री असताना भोसे खुर्द प्रकल्प अंतर्गत शेती व्यवसाय करिता उन्नतीची वाढ झाली तर 1984 देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधीजींनी ज्या गोसेखुर्द प्रकल्पाची कल्पना मांडली व सोनिया गांधींनी शेतकऱ्यां प्रतिउदारता दाखवून त्यावेळचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना प्रकल्प मंजुरी देण्यासाठी व 4990 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. गोसेखुर्द प्रकल्प पूर्णत्वास जाण्याचे संपूर्ण श्रेय यूपीए सरकारचे असून आज शेतकऱ्यांच्या उत्पादनात या प्रकल्पामुळे मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र आजच्या भाजप सरकार काळात शेतकरी देशोधडीला लागला असून शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. मतदार संघातील शेतकऱ्यांच्या आता पुढील वर्षी स्थान व मक्का उत्पादनाला हमीभाव आणि खरेदी करून शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नतीसाठी मोठा इथेनॉल प्रोजेक्ट उभारणी सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यानंतर सर्व नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदेवाहीच्या सभापती, उपसभापती व संचालक मंडळांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊ सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देत शेतकऱ्यांचे प्रगती साधने हेतू प्रयत्नशील राहणार अशी काही नवनिर्वाचित सभापती रमाकांत लोधे यांनी दिली. यावेळी तालुक्यातील सहकार क्षेत्र, ग्रामपंचायत गट, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply