मुंबई, 15 मे (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना करून शौर्याची जी परंपरा निर्माण केली, ती छत्रपती संभाजी महाराज यांनी अतिशय स्वाभिमानाने पुढे चालवली; तीच परंपरा महाराणा प्रतापसिंह यांनी देखील जपली होती. ज्यातून आपण आजही प्रेरीत होतो, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले.
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनात उपस्थित राहण्याठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज छत्रपती संभाजीनगरला भेट दिली.
याप्रसंगी उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करून, बलिदान देणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या जीवनापासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्र्यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री अतुल सावे, महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, छत्रपती संभाजीनगर शहराचे पालकमंत्री संदिपान भुमरे, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर शहराचे नामकरण केल्याबद्दल राजनाथसिंह यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांचे यानिमित्ताने अभिनंदन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केलेल्या भाषणात राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
हिंदुस्थान समाचार
NNNN
Leave a Reply