रत्नागिरी, 15 मे, (हिं. स.) : अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कोकण प्रांत कार्यकारिणीवर रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण ऊर्फ प्रमोद कोनकर आणि लांजा येथील साहित्यिक सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांची निवड झाली आहे.
अ. भा. साहित्य परिषदेच्या कोकण प्रांत कार्यकारिणीची बैठक मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारकात डॉ. नरेंद्र पाठक, प्रवीण देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पुढील दोन वर्षांसाठी कोकण प्रांताची कार्यकारिणी निश्चित करण्यात आली. त्यामध्ये श्री. कोनकर आणि सौ. देवगोजी यांची निवड झाली आहे.
नव्याने निवड झालेली कोकण प्रांत कार्यकारिणी अशी – कवी दुर्गेश सोनार (अध्यक्ष), प्रवीण देशमुख (कार्याध्यक्ष), सौ. अरुंधती जोशी (उपाध्यक्ष), मोहनराव ढवळीकर (संघटन मंत्री), संजय द्विवेदी (मंत्री), सदस्य – प्रा. श्यामसुंदर पांडे (कल्याण अध्यक्ष), विजयराज बोधनकर (ठाणे अध्यक्ष), प्रवीण अंगारा (दक्षिण मुंबई अध्यक्ष), प्रा. देवीदास कळवले (वसई- विरार-भाईंदर-नालासोपारा प्रमुख), अजित शेडगे (माणगाव, रायगड जिल्हा प्रमुख), बाळकृष्ण विष्णु तथा प्रमोद कोनकर (रत्नागिरी), सौ. विजयालक्ष्मी देवगोजी (लांजा, रत्नागिरी), डॉ. बापू भोगटे (सिंधुदुर्ग), सौ. आर्या आपटे (मुंबई पूर्व उपनगर), सौ. मीनल वसमतकर (कामोठे, पनवेल), श्रीमती कल्पना देशमुख (नवी मुंबई भाग १), सौ. स्मिता हर्डीकर (नवी मुंबई भाग -२).
परिषदेची रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारिणी लवकरच निवडण्यात येणार आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply