Home राजकारण संगमनेर बाजार समिती सभापती पदी शंकरराव खेमनर पाटील यांची निवड

संगमनेर बाजार समिती सभापती पदी शंकरराव खेमनर पाटील यांची निवड

संगमनेर बाजार समिती सभापती पदी शंकरराव खेमनर पाटील यांची निवड

अहमदनगर, 14 मे (हिं.स.):- विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अग्रगण्य असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शंकरराव पाटील खेमनर यांची फेरनिवड झाली असून उप सभापती पदी आश्वीचे गीताराम दशरथ गायकवाड यांची एकमताने निवड झाली आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शंकरराव पा.खेमनर यांच्या चेअरमनपदाची सूचना कैलास पानसरे यांनी मांडली.निलेश कडलग यांनी अनुमोदन दिले.व्हा.चेअरमन पदासाठी गिताराम गायकवाड यांच्या नावाची सूचना अरुण वाघ यांनी मांडली.सतीश खताळ यांनी अनुमोदन दिले.

या निवडीनंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांची यशोधन जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.यावेळी समवेत कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात,कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे आदी उपस्थित होते.सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव सतीश गुंजाळ यांनी काम पाहिले.

आमदार थोरात म्हणाले की,संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्था ह्या राज्याला आदर्शवत आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या गुणवत्तापूर्ण कामातून राज्यात लौकिक निर्माण केला आहे.शेतकरी व्यापारी यांना अत्याधुनिक सुविधा देताना विविध ठिकाणी उपबाजार सुरू केले आहे.नेतृत्वाची समृद्ध परंपरा लाभलेल्या या बाजार समितीमध्ये नवनिर्वाचित संचालक मंडळ हे चांगले काम करताना या बाजार समितीचा गौरव वाढवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करून नवनिर्वा चित संचालकांना शुभेच्छा दिल्या.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.