अकोला, 13 मे (हिं.स.) : घरची हलाखीची परिस्थिती असताना वंचित बहुजन आघाडीकडून सरपंच म्हणून निवडून आलेले दिगंबर पिंप्राळे जेवढा आनंद त्यांना सरपंच झाल्यावर झाला त्यापेक्षाही जास्त आनंद त्यांना आज झाला त्याच झालं असं वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी या सरपंचाला थेट दुचाकीच भेट म्हणून दिली. दिगंबर पिंप्राळे हे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील सरपंच अजूनही गावात पायी फिरतात, त्यांची हलाखाची परिस्थिती पाहता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या अनुषंगाने सरपंच पिंप्राळेंना भन्नाट गिफ्ट दिलं आहे. सरपंच दिगंबर पिंप्राळे दुचाकी भेट दिली. आज आंबेडकरांनी आपल्या हातानं चाबी देऊन दुचाकी भेट दिली आहे. या अनोख्या भेटीमुळे सरपंचाच्या चेहऱ्यावर आनंद चांगलाच फुलला आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply