पुणे 13 मे (हिं.स) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या खडकवासला येथील संरक्षण तंत्रज्ञानावरील शिक्षण देणाऱ्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा (डीआयएटी) १२ वा दीक्षांत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायणन यांनी पत्रकार परिषदेत दिली.डीआयएटीचा दीक्षांत सोहळा येत्या सोमवारी (ता. १५) होणार आहे. यंदा संस्थेतील २८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये २६१ विद्यार्थी एम.टेक व एम.एस्सीचे तर २२ पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या वेळी सरंक्षण मंत्री सिंह यांच्यासमोर विविध संशोधन, प्रयोग आदींचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply