Home राजकारण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘विकासाची दिशा’ पॉकेट बुकचे प्रकाशन

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘विकासाची दिशा’ पॉकेट बुकचे प्रकाशन

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘विकासाची दिशा’ पॉकेट बुकचे प्रकाशन

वाशिम, 12 मे (हिं.स.) : पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या अल्पसंख्यांक योजनांची माहिती असलेल्या ‘विकासाची दिशा’ या पॉकेटबुक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘विकासाची दिशा’ ही पॉकेबुक माहिती पुस्तिका सन 2022-23 च्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) यामधून तयार केली आहे. या पॉकेटबुक माहिती पुस्तिकेत अल्पसंख्यांक समाजाचे संवैधानिक हक्क, त्याबाबतची कलमे, राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या योजना यामध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना, मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना, उन्नती मुदत कर्ज योजना, सुक्ष्म पतपुरवठा योजना, उच्च व व्यावसायीक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मौलाना आझाद मोफत शिकवणी योजना, निरंतर प्रशिक्षण योजना, अल्पमुदतीच्या व्यावसायीक प्रशिक्षणासाठी अनुदान योजना, मॉल्समध्ये नोकरीसाठी प्रशिक्षण, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण योजना, अल्पसंख्यांक विद्यार्थीनीसाठी वसतीगृह योजना, केंद्र शासनाच्या काही महत्वाच्या शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम, क्षेत्रविकास कार्यक्रम योजना, डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना आदींची माहिती देण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.