Home राजकारण ठाण्यात 13 एप्रिल रोजी एकदिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

ठाण्यात 13 एप्रिल रोजी एकदिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

ठाण्यात 13 एप्रिल रोजी एकदिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

ठाणे, १२ एप्रिल, (हिं.स) : महाराष्ट्रातील सर्व मत निर्माते आणि शिक्षणतज्ञांना एकत्र आणण्यासाठी (ठाणे, मुंबई आणि एमएमआर वर लक्ष केंद्रीत करून) एनईपी च्या युगात शैक्षणिक जगताच्या बदलत्या परिस्थितीवर चर्चा व विचारमंथन करण्यासाठी IScholar Knowledge Services Pvt. Ltd. मुंबई यांच्यासंयुक्त विद्यमाने हिरानंदानी मेडोज्, ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथे गुरुवार दि. 13 एप्रिल, 2023 रोजी एक दिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर कार्यक्रमास शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी यावेळी ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांचे मुख्याध्यापक व संस्थाचालक किंवा त्यांचे प्रतिनिधी तसेच मुंब्रा, कळवा कार्यक्षेत्रातील शाळांचे मुख्याध्यापक यांनी योग्य त्या लेखन साहित्यासह वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी सकाळचा चहा, नाश्ता व दुपारच्या जेवणाची सोय केलेली आहे.

दि. 13 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत संपन्न होणाऱया या कार्यक्रमात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंग देओल, एससीईआरटी शालेय शिक्षण विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगांवकर, शिक्षण विभागाचे आयुक्त सूरज मांढरे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि ठाणे मनपाचे आयुक्त अभिजीत बांगर हे या कार्यक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, ज्येष्ठ लेखक, शिक्षणतज्ञ डॉ. प्रा. प्रदीप ढवळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग सह सचिव इम्तियाज काझी, आयकेएसपीएलचे संस्थापक आर. पी. नडेला, सह संस्थापक विवेक ओबेरॉय आणि असोशिएट सुशिल वाघुले आणि हरीश मिश्रा हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.