मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडन दौऱ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्या प्रकरणी बदनामीची फौजदारी तक्रार दाखल करण्यात आलीय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी ही तक्रार दाखल केलीय.
वि.दा. सावरकरांच्या भावाचा नातू असलेल्या सत्यकी सावरकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राहुल गांधी गेल्या महिन्यात इंग्लंडला गेले होते त्या ठिकाणी त्यांनी एका भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकाचा संदर्भ देताना चुकीची माहिती दिली आहे. सावरकरांनी आपल्या 5 ते 6 मित्रांच्यामदतीने एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा आनंद लुटल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. परंतु, राहुल गांधींनी सांगितलेला हा संदर्भ खोटा असून केवळ काल्पनिक आहे. त्यामुळे राहुल गांधींनी खोटा किस्सा सांगून सावरकरांची बदनामी आणि अपमान केला आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांकडून आम्ही अनेकदा सावरकरांविरोधातील तथाकथीत माफीनामा आणि पेन्शनबाबत ऐकले आहे. पण प्रत्यक्षात त्या क्षमा याचिका आणि निर्वाह भत्ता होता. त्यामुळे राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील या विधानांविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, अशी माहिती सत्यकी सावरकर यांनी दिली आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply