Home राजकारण चंद्रपूर : मनपा अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी ध्यान शिबीर

चंद्रपूर : मनपा अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी ध्यान शिबीर

चंद्रपूर : मनपा अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी ध्यान शिबीर

चंद्रपूर 11 मे (हिं.स.)- चंद्रपूर महानगरपालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे ध्यान शिबिर राणी हिराई सभागृहात पार पडले.

योग आणि ध्यान अनेक वर्षांपासुन भारतीय संस्कृतीचा अभिन्न भाग आहे. मात्र काही काळापासुन आधुनिकतेच्या नावावर आपण आपल्या आरोग्याविषयी इतके बेजजाबदार झालो राहतो की समाजाचा मोठा भाग हा मानसिक तणावग्रस्त आहे. सांस्कृतीक मंत्रालयाने या दिशेनं एक सकारात्मक पाऊल ” हर घर ध्यान ” अभियानद्वारे उचलले आहे.आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातुन ” हर घर ध्यान ” अभियान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशभरात चालविले जात असुन त्याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेत ध्यान शिबीर घेण्यात आले.

महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण असतो. वेगवान जीवनात, अनेक घटक उच्च-ताणाच्या पातळीत योगदान देतात. तणावाचा केवळ मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. ध्यान हा जुना सराव आहे जो तणाव पातळी कमी करण्यासाठी ओळखला जातो. व्यस्त जीवनशैली आणि व्यस्त दिनचर्येमध्ये ध्यानासाठी वेळ काढणे महत्वाचे आहे. १० मिनिटांच्या ध्यान सत्राने तुम्ही तुमचा ताण कसा कमी करू शकता याचे मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले.

मुग्धा तरुण खांडे यांच्या पुढाकारातून योगिता वानखेडे,रवींद्र लाखे, वृंदा लाखे, प्रीती संघवी, स्वाती बच्चूवार या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चमुने उपस्थित मनपा अधिकारी – कर्मचाऱ्यांना तणाव व्यवस्थापन व आनंदी जीवनाचे रहस्य याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी कर्मचाऱ्यांसाठी आनंदी राहण्याचे तंत्र व तणाव मापन चाचणी घेण्यात आली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.