गुवाहाटी, 10 एप्रिल (हिं.स.) : अवमानना प्रकरणी सूरत कोर्टातून 2 वर्षांची शिक्षा झालेल्या राहुल गांधींची अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आता राहुल यांच्या विरोधात अवमानना याचिका दाखल करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे नाव अदानीसोबत जोडल्यामुळे हिमंता बिस्व सरमा संतप्त झाले आहेत.
अदानी प्रकरणामध्ये हिमंता बिस्वा सरमा यांचे नाव जोडण्यासाठी राहुल गांधी यांनी ADANI नावाचे प्रत्येक अक्षर वापरले. यामध्ये काँग्रेसच्या अशा 5 नेत्यांची नावे लिहिली होती, ज्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री हिमंता सरमा म्हणाले की, अदानीसोबत आपले नाव जोडणे हे अवमानाचे कृत्य असल्याचे आहे. ’राहुल यांनी जे काही ट्विट केले आहे ते अपमानास्पद ट्विट आहे. पंतप्रधान मोदींचा दौरा झाल्यानंतर आपण आसाम न्यायालयात खटला दाखल करणार आहे. येत्या 14 एप्रिलनंतर राहुल गांधींविरोधात खटला दाखल करणार असल्याचा इशारा आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी दिला.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply