चंद्रपूर 10 मे (हिं.स.)- येत्या पावसाळ्यात जुलैमध्ये अल-नीनोची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा परिणाम पुढील पावसावर होण्याची शक्यता बघता शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, असे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नियोजन सभागृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पार पडली. अतिशय महत्त्वाचे असलेल्या या हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंत्रणेला दिले.
यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, जुलैमध्ये अल-नीनोची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये पडणाऱ्या पावसावर होईल. कमी पाऊस झाला तर कसे नियोजन करायचे, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याचा सिंचन आणि कृषी विभागाने अभ्यास करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उकिरडा मुक्त गाव – खतयुक्त शिवार अभियानच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply