नवी दिल्ली, 9 जून (हिं.स.) : जम्मू इथले श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची भावना अधिक दृढ करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या ट्वीट थ्रेडला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले, “हे आपल्या परंपरेची समृद्धता साजरी करेल आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची भावना अधिक दृढ करेल.”
केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी आणि जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुरुवारी व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे उद्घाटन केले. व्यंकटेशाचे हे देशातील सहावे तर जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पहिले मंदिर आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply