मुंबई, 9 मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते “गेट टुगेदर” या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ‘वय वाढतं पण आठवणी तशाच राहतात’ अशी कॅची टॅगलाइन असलेला “गेट टुगेदर” हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.
सतनाम फिल्म्स प्रस्तुत “गेट टुगेदर” या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील या वेळी उपस्थित होते. “गेट टुगेदर” या चित्रपटाचा टीजर रीलिज झाल्यापासूनच चित्रपट चर्चेत आहे.त्याशिवाय आतापर्यंत रिलिज केलेल्या दोन्ही गाण्यांना उत्तम प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply