Home राजकारण शहरी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाचा स्मार्ट प्रकल्पासाठी जायकासोबत संयुक्त करार

शहरी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाचा स्मार्ट प्रकल्पासाठी जायकासोबत संयुक्त करार

शहरी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाचा स्मार्ट प्रकल्पासाठी जायकासोबत संयुक्त करार

नवी दिल्ली, 8 मे (हिं.स.) : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाने संयुक्तपणे जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी -जायका (JICA) सोबत ‘मुंबई-अहमदाबाद शीघ्रगती रेल्वेसह स्थानक क्षेत्र विकास’ (प्रोजेक्ट-SMART) साठी सामंजस्य करार केला आहे. स्मार्ट या प्रकल्पांतर्गत मुंबई – अहमदाबाद शीघ्रगती रेल्वेस्थानकांच्या ( MAHSR) आसपासचा परिसर विकसित करण्यासाठी प्रवाशांची आणि इतर भागधारकांची सुलभता आणि सुविधा वाढवणे तसेच स्थानकाच्या आसपासच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी काम केले जाते. या प्रकल्पामुळे, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहर विकास प्राधिकरणे, यांची MAHSR स्थानाकांच्या आसपासच्या परिसराच्या विकासाची क्षमता वाढवणे, हा परिसर विकसित करणे आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची संस्थात्मक क्षमता वाढू शकेल. हा सामंजस्य करार- चार हाय स्पीड रेल्वे स्थानके- गुजरातमधील साबरमती आणि सूरत तसेच महाराष्ट्रातील ठाणे आणि विरार स्थानक परिसरांचा विकास करण्यासाठी झाला आहे. या मार्गावर एकूण 12 स्थानके आहेत. सूरत, विरार आणि ठाणे ग्रीनफील्ड स्थानके तर साबरमती ब्राऊन फील्ड विकास स्थानक आहे.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, गुजरात आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारे आणि जायका मिळून, स्मार्ट प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी, दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबईत अनेक चर्चासत्रे तसेच प्रत्यक्ष स्थळांना भेट देण्याचे उपक्रम आयोजित करत आहेत. या मालिकेतील पहिले चर्चासत्र, नवी दिल्लीत निर्माण भवन इथे, आज म्हणजेच 8 मे रोजी आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला जपान दूतावासाचे अधिकारी, जायका मुख्यालयातील तसेच जायका इंडियाच्या कार्यालयातील अधिकारी, त्यांचे तज्ज्ञ, रेल्वे मंत्रालय, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयांचे अधिकारी यांनी चर्चेत भाग घेतला.

या चर्चेमधून, साबरमती, सूरत, विरार आणि ठाणे एचएसआर स्थानकांसाठी स्थानक परिसर विकास योजना तयार करण्यात आणि जपान, भारत आणि इतर देशांमध्ये ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट आणि इतर देशांमध्ये अवलंबलेल्या पद्धती आणि त्यांचे अनुभव समाविष्ट असलेले मॉडेल हँडबुक तयार करण्यात मदत मिळू शकेल.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.