भंडारा ०६ जुन (हिं. स.) :- मला मंत्रिपद देत नसाल तर भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. मात्र, बाहेरचा पालकमंत्री दिल्यास त्याला १०० टक्के विरोध असेल, असा इशारा भंडाऱ्यातील शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा आता निर्णय घ्यायलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.
राज्यातील शिंदे – फडणवीस यांचे सरकार येवून आता वर्षभराचा कालावधी झाला असला तरी, मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. याबाबत भंडाऱ्याचे शिंदे गटाचे समर्थक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सरकारला इशाराच दिला आहे. जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर, जिल्ह्याचा पालकमंत्री असायला हवा. मला जर मंत्रिपद देत नसाल तर, भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. अन्य जिल्ह्याला ज्या पद्धतीने स्थानिक पालकमंत्री देता, त्या पद्धतीने भंडारा जिल्ह्यालाही मिळायला हवा अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply