ठाणे, 6 जून, (हिं.स.) : ठाणे शहराबरोबर वेगाने वाढणाऱ्या दिवा शहरातील नागरिकांनाही ठाणेकरांसारख्या सेवा- सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दिवा शहरावर विशेष प्रेम असणारे स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने दिवा शहर व परिसरात होणाऱ्या विविध विकास कामाचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळा बुधवार 7 जुन रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते होणार आहे, अशी माहिती शिवेसना दिवा शहर प्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिली आहे.
मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये दिवा विभागाचे नागरिकरण झपाटयाने होत असून आजमितीस या विभागाची चार ते पाच लक्ष लोकसंख्या आहे याठिकाणी राहणारे नागरीक मध्यमवर्गीय आहेत या नागरिकांना मुलभूत सोईसुविधा मिळाव्यात यासाठी स्थानिक खा. डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर मानदंड ठरणारे विशेष प्रकल्प राबविण्याच संकल्प शिवसेना पक्षाने घेतला असून याला मुहूर्त स्वरुप देत एकाच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामाचा शुभारंभ बुधवार 7 जुन रोजी आयोजित केला असून यामध्ये प्रामुख्याने दुपारी 4.00 वा पुरातत्व खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरणाचे भुमिपूजन, सायं 5.00वा आगरी कोळी वारकरी भवन भुमिपूजन व सायं 06.00 दिवा शहरातील धर्मवीर नगर, दिवा आगासन रोड दिवा येथे दिवा शहरातील नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन मुख्य रस्ता, आरोग्य केंद्र, दातिवली गाव येथे व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गाव येथील शाळा या कामाचा लोकार्पण सोहळा तर आगासन देसाई खाडी पुल, सामाजिक भवन धर्मवीर नगर, दातिवली तलाव सुशोभिकरण, दिवा शीळ रोड, देसाई गाव तलाव या कामांचे भुमिपूजन होणार आहे. तसेच दिवा शहरातील नागरिकांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात येणार असून या सोहळयास मोठया संख्येने उपस्थित राहुन या ऐतिहासिक सोहळयांचे साक्षीदार व्हावे, असे मढवी यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply