मुंबई, 5 मे (हिं.स.) : ‘तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी तथागत बुद्धांच्या चरणी अभिवादन अर्पण केले आहेत.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वशांतीचा, सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाचा संदेश हा अनंतकाळ टिकणारा, त्रिकालाबाधित – चिरकाल असा आहे. त्यांनी दिलेल्या पंचशील तत्वांचा अंगीकार हा सगळ्यांच्याच उत्थानाचा मार्ग आहे. तथागतांचा आज जन्मोत्सव आणि ज्ञानप्राप्तीचा दिन. या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी प्रणाम. या बुध्द पौर्णिमेच्या पवित्र आणि मंगल अशा क्षणाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply