मुंबई, 4 जून (हिं.स.) सुलोचनादीदी म्हणजे कुटुंबातीलच एक सदस्य अशी छाप मराठी मनावर उमटविणारी व्यक्ती! आजच्या सायंकाळी हे नाते काळाने हिरावून नेले. आई, बहीण, वहिनी, आत्या, मामी, मावशी अशी अनेक कौटुंबिक नाती त्यांनी अभिनयाच्या जोरावर केवळ पडद्यावरच साकारली नाही, तर घराघरात निर्माण केली. आपल्या सोज्वळ दिसण्यासह सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आत्मीयता निर्माण केली. त्यांना राज्य सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानीत केले होते. त्यांच्या जाण्याने मी व्यथित झालो. त्यांना विन्रम आदरांजली, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply