नवी दिल्ली, 04 एप्रिल (हिं.स.) : पंश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचाराची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी 4 एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना 3 दिवसात दंगलीचा अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
पश्चिम बंगालच्या भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून बंगालमध्ये हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याची तक्रारी केली होती. या पत्रानंतर गृह मंत्रालयाने हा अहवाल मागवला आहे. तत्पूर्वी, गुरुवारी गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस आणि पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख सुकांत मजुमदार यांच्याशी चर्चा करून राज्यातील हावडा येथे रामनवमी शोभायात्रेदरम्यान झालेला हिंसाचार आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता.
सुकांत मजुमदार यांनी आपल्या पत्रात लिहिले, हुगळी जिल्ह्यातही भाजपच्या मिरवणुकीतही गोंधळ घालण्यात आला. यानंतर रेल्वे स्थानकांवर जोरदार दगडफेक झाली. यानंतर रेल्वे सेवा निलंबित करण्यात आली आणि हे पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष टीएमसी आणि त्यांच्या समर्थनाशिवाय सुरू ठेवले जाऊ शकत नव्हते. याशिवाय, भाजपचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार सुकांत मुझुमदार यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यातील हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांचीही भेट घेतली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply