Home राजकारण सुलोचना दीदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी – विनोद तावडे

सुलोचना दीदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी – विनोद तावडे

सुलोचना दीदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी - विनोद तावडे

मुंबई, 4 जून (हिं.स.) सुलोचना दीदी म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्राचा सालस चेहरा. त्यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी साकारलेल्या सोज्वळ भूमिका सर्वांनाच आपल्या घरातील थोरामोठ्यांच्या मायेची आठवण करून देतात. त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’, ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज त्यांच्या निधनाने आपल्या कुटुंबातीलच एक ज्येष्ठ आणि मायाळू व्यक्ती हरपल्याची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. सुलोचना दीदींच्या आत्म्यास शांती लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत विनोद तावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.