Home राजकारण तुम्ही म्हणालं तेच खरं ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ – उद्धव ठाकरे

तुम्ही म्हणालं तेच खरं ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ – उद्धव ठाकरे

तुम्ही म्हणालं तेच खरं ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ - उद्धव ठाकरे

छत्रपती संभाजीनगर, २ एप्रिल (हिं.स.) : सावरकर गौरव यात्रा जरुर काढा, आता हिंदू जनाक्रोश मोर्चा शिवसेना भवनाकडे आणला. या देशाचा पंतप्रधान शक्तीमान असूनही तुम्हाला हिंदू जन आक्रोश यात्रा का काढावी लागते. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला गेला. घटनेची शपथ घेतल्यावर जातीय तेढ निर्माण करतात. मी काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असेल तर मुफ्ती मोहम्मद सोबत गेल्यावर तुम्ही काय सोडले. तुम्ही म्हणाल तेच खरं ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. ते महाविकास आघाडीतर्फे आयोजित वज्रमूठ सभेत बोलत होते.

सत्ता गेल्यावरही आम्ही घट्टपणे एकत्रच

तिघे एकत्र आले पण सत्ता गेल्यावर पण आम्ही घट्टपणे एकत्रच आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आरोप करून गेले, मी विचारतो त्यांना मी बाळासाहेबांची भाषा बोलू शकतो, मग भाजप मिंधेंचे काय चाटतंय. चांगली चाललेली सरकारे पाडायची मग तेव्हा तुम्ही नितिश कुमारांचे काय चाटत होतात? मोदी म्हणतात त्यांची प्रतिमा खराब करतायत. मग आमची प्रतिमा नाही का? तुमचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान? विरोधी पक्षातील लोकांना त्रास दिला जातोय. तुम्ही मेघालयात संगमांवर भष्टाचाराचे आरोप केले होते, आता तुम्ही संगमांचे काय चाटताय?

…तर पाकव्याप्त मिळून दाखवा

भ्रष्ट दिसला की घे पक्षात, सगळे भ्रष्ट तुमच्या पक्षात मग हा भारतीयांचा अपमान आहे. भ्रष्टाचारी पक्ष म्हणून नाव ठेवा. आता भाजपच्या व्यासपीठावर सगळे संधी साधू. तुमचे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही. लोकशाही संपवायची इतरांना ठेवायचे, तुरूंगात टाकायचे. सावरकरांचे स्वप्न अखंड हिंदुस्थानचे होते. भाजपात हिंमत आहे का? आधी पाकव्याप्त जमीन मिळून दाखवा. सरदार सरोवर बांधले, मराठवाडा वल्लभभाई पटेलांमुळे. नुसतं पोलाद जमा केले पण तुमच्या रक्तात ते उतरले असेल तर पाकव्याप्त मिळून दाखवा.

जनता मतदानाला उतरेल तेव्हा तुम्ही वाचणार नाही

संकट येते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मदत केली. भाजपची पालखी व्हायला शिवसेनेचा जन्म नाही तो भूमीपुत्रांसाठी आहे. आपले नाव, चिन्ह आणि वडील चोरायचा प्रयत्न केला. यांचे वडील म्हणत असतील काय दिवटं कार्ट, यांना बाप पण दुसरे लागतात. या मोदींना घेऊन या, मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो. मला जनतेचे आशीर्वाद ते तुम्ही चोरू शकत नाही. इतरांचे विचार तुमचे वाचू का? म्हणून विचारता पण जनता मतदानाला उतरेल तेव्हा तुम्ही वाचणार नाही.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.