बेंगळुरू, 01 मे (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज, सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी बंगळुरू येथे जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी पक्षाने, दारिद्र रेषेखालील कुटुंबांना 3 स्वयंपाक गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले. तसेच, समान नागरी संहितेचे आश्वासनही दिले आहे
हीरनाम्यात सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वर्षाला 3 मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. हे मोफत गॅस सिलिंडर उगादी, गणेश चतुर्थी आणि दीपावली सणानिमित्त दिले जातील.तसेच ‘पोषण’ योजना सुरू केली जाईल. याद्वारे प्रत्येक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध आणि मासिक रेशन किटद्वारे 5 किलो श्री अण्णा- सिरी धान्य दिले जाणार असल्याचे जाहीरनाम्यात नमूद केले आहे. त्यासोबतच अनुसूचित जाती व जमातीच्या कुटुंबातील महिलांसाठी 5 वर्षांसाठी 10 हजार रुपयांची एफडी. जागतिक दर्जाच्या मानकांनुसार सरकारी शाळांचा दर्जा वाढवा यासाठी प्रयत्न. ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी. कल्याण सर्किट, बनवासी सर्किट, परशुराम सर्किट, कावेरी सर्किट, गंगापुरा सर्किटसाठी 2500 कोटी तसेच 5 लाखांच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.त्यासोबच 5 किलो तांदूळ आणि 5 किलो भरड धान्य आणि शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी 10 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आलीय.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply