अमरावती, ०१ मे (हिं.स.) :शंकुतला रेल्वे पुन्हा सुरू व्हावी याकरिता शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीकडून वेगवेगळ्या टप्प्यावरील आंदोलने सुरू आहेत. याचाच एक भाग व १९ व्या टप्प्याचे आंदोलन म्हणून आज १ मे महाराष्ट्र दिनी याच रेल्वेमार्गावरून अचलपूर ते नौबाग रेल्वे स्टेशन पर्यंत समितीकडून पायदळ तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. हे अंतर पाच किलोमीटरचे होते तर आजच्या आंदोलनात नागरिकांसह लहान मुले हि मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रेल्वे मार्गावरील रस्त्यात असलेली झुडपे, झाडे, केर-कचरा जमा करून अचलपूर स्टेशन ते नौबाग रेल्वे स्टेशनपर्यंतचा ५ किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक गेल्या आठवड्यात मोकळा करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शकुंतला रेल्वे सुरू झालीच पाहिजे, गरीबो की नाडी है, शकुंतला गाडी है’ असे नारे देत, रेल्वे मार्ग स्वच्छ करीत सर्वजण नौबाग येथे पोहचले. आज याच रेल्वेमार्गावरून अचलपूर ते नौबाग रेल्वेस्टेशनपर्यंत समितीकडून पायदळ तिरंगा रॅली काढण्यात आली या ली मध्ये तब्बल ३० संघटनांनी आपला सहभाग देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.नौबाग रेल्वे स्टेशन येथे पोहचल्यानंतर रेल्वे पुलाखाली मानवी साखळी तयार करीत शकुंतला समर्थनार्थ घोषणा दिल्यात शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीकडून नेहमीच शकांतूला रेल्वे साठी आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधतात.
बंद असलेली शंकुतला पूर्ववत सुरू व्हावी म्हणून अमरावती, अकोला, यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांची प्रचंड इच्छा आहे. सातत्याने आंदोलने, भेटी, निवेदने, शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. शंकुतला बचाव समिती वेगवेगळ्या प्रकारचे प्रतीकात्मक आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधत आहे. शंकुतला बंद झाल्यामुळे रेल्वे ट्रॅक झाडा-झुडपांनी व्यापला गेला आहे. अनेक ठिकाणी तर दहा ते 15 फूट मोठमोठे काटेरी झुडपे तयार झाली होती. शकुंतला बचाव समितीच्या सदस्यांनी श्रमदान करीत हा पाच किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक पूर्ण मोकळा केला. यावेळी योगेश खानजोडे, गजानन कोल्हे, राजा धर्माधिकारी, राजेंद्र जयस्वाल, पंकज शर्मा, संजय ठाकरे, रामदास म्हसने, वसंतराव धोबे, संजय डोंगरे, प्यारेलाल प्रजापती, धांडे उपस्थित होते
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply