Home Latest Posts

Category: Latest Posts

Post
मुंबई-गोवा जागतिक 'जैवविविधता महामार्ग' करूया

गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात विठुरायाचा गाभारा फुलांनी सजला

सोलापूर , 22 मार्च (हिं.स.) : गुढी पाडवा अर्थात चैत्र प्रतिपदा हिंदू मराठी नवावर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त पंढरपूरच्या विठुरायाचे मंदिर सजवण्यात आले आहे. मंदीरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. झेंडु, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडु, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, औरकेड अशा विविध फुलांची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. सण-उत्सवानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदीराला वेगवेगळ्या प्रकारे सजवण्यात येते....

Post

रत्नागिरी : माहेर संस्थेत पुस्तकांची गुढी

रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर संस्थेत पुस्तकांची गुढी उभारून सणाचे महत्त्व जपण्यात आले. संस्थेत वर्षातील सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडतात. यावर्षी गुढीपाडवा हा सणदेखील उत्साहाने पार पडला. या गुढीपाडव्यानिमित्त नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून पुस्तकांची गुढी उभारण्यात आली. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. ते ज्या पुस्तकातून मिळते त्या पुस्तकांना वाचणे,...

Post

खा. नवनीत राणांनी दिल्लीतील निवासस्थानी उभारली गुढी

अमरावती, 22 मार्च, (हिं.स.) साडे तीन शुभ मुहूर्ता पैकी एक मुहूर्त आणि मराठी नवीन वर्षाचा दिवस असल्याने राज्यात सध्या गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढत लोक आपला आनंद दाखवत आहेत. असाच उत्साह राज्याबाहेरही पहायला मिळत आहे. चक्क दिल्लीत ही गुढीपाडव्याचा उत्साह दिसत असून खासदारांच्या निवासस्थानी गुढी उभारल्याचे दिसत आहे. अमरावतीच्या खासदार...

Post

भारतीय नववर्षाचे आनंददायी स्वागत, संस्कार भारतीची पाडवा पहाट उत्साहात

अमरावती, 22 मार्च (हिं.स.) कोणताही उपक्रम सुरू करताना असलेला उत्साह सातत्याने तेवीस वर्षे टिकवून यशस्वी करण्याची परंपरा अमरावती संस्कार भारतीने राखली आहे.भारतीय नववर्षाचे स्वागत आनंददायी आणि अभिनव पद्धतीने आज करताना सृष्टी सृजनाच्या नव वर्षदिनी संस्कार भारतीच्या पाडवा पहाटमध्ये नृत्य,नाट्य,संगीत,साहित्य,रांगोळी अशा विविध विधांच्या सशक्त सादरीकरणातून सुमारे पावणेदोनशे कलावंतांनी अमरावतीकरांची उत्स्फूर्त दाद घेतली.अभिजात भारतीय कला परंपरांचा वेध...

Post

कापूराच्या ज्योतीने सावंगा विठोबा झाले प्रकाशमान

अमरावती, 22 मार्च, (हिं.स.) कापूर ज्योती मेघशामा, अरे रामा माहेर होव भाविक भक्ताचं, पहा या सवंगयचं!, सुख जन्म मरण देहीचे, हरतील दुःख, कृष्ण महाराज, धन अवधूताचे, या या कृष्णाची महाराजांच्या ओवीची घुण सांवगा येथे निनादले असुन कापुराच्या ज्योतीने अख्खी सावंगा नगरी आज प्रकाशमय झालेली पहावयास मिळाली. मागील दोन वर्षांपासून कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे प्रशासनाने राजकीय,...

Post

राजधानीत गुढीपाडवा साजरा.

नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.) महाराष्ट्राप्रमाणेच राजधानी दिल्लीस्थित महाराष्ट्र सदन येथे गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला. कोपर्निकस मार्गावर असलेल्या महाराष्ट्र सदनात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी डॉ.अडपावार यांनी सर्व उपस्थितांना गुढीपाडव्याच्या व नववर्षारंभाच्या शुभेच्छा दिल्या. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह सदनातील व...

Post

गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात राज्य सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’चे वाटप

ठाणे, 22 मार्च, (हिं.स.) गुढीपाडव्यानिमित्ताने राज्य सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या हस्ते कोपरीत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारने सर्वसामान्यांचे सण आनंदात जावेत, यासाठी ‘आनंदाचा शिधा हा उपक्रम सुरू केला आहे त्या अंतर्गत ठाणे शहरातील नागरिकांना आनंदाचा शिधावाटप करण्यास आज कोपरी येथे सुरुवात...

Post

सातवाहनकालीन तीर्थखांबावर उभारली हिंदू नववर्षाची गुढी

छत्रपती संभाजीनगर, 22 मार्च (हिं.स.) : मराठी हिंदू नववर्षानिमित्त पैठण शहरातून शालिवाहन सम्राटाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.पुरातन तिर्थखांबावर मराठी नववर्षाची गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. सातवाहन साम्राज्याची राजधानी असलेल्या पैठणनगरीतून प्रस्थापित केलेल्या कालगणनेनुसारच ‘शालिवाहन शके ‘ हे हिंदू नववर्ष जगभर साजरे केले जाते यंदा ४१ वे वर्ष आहे. शककर्ता शालिवाहन राजाच्या दैदिप्यमान कारकिर्दिचे स्मरण...

Post

रत्नागिरी : गुढीपाडवा तारका स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेत पारंपरिक साज करून शेकडो महिला, मुली सहभागी झाल्या होत्या. आपल्या परंपरेचे जतन करणाऱ्या महिलांमधून समीक्षा पाडाळकर, अबोली शेट्ये, माधुरी वाघोले, गौरी देवळे, मधुरा ढेकणे आणि संजना नार्वेकर या ६ गुढीपाडवा तारकांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर...

Post

रत्नागिरी : हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत १२ हजार नागरिकांचा सहभाग

रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदुकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्थांच्या माध्यमातून आज हिंदू एकतेचे दर्शन घडवत हिंदू नववर्ष स्वागतयात्रा जल्लोषात काढण्यात आली. यामध्ये पारंपरिक वेशभूषेत रत्नागिरीकर हिंदू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रेत १०० हून अधिक संस्था, चित्ररथ सहभागी झाले. तसेच १२ हजारांहून अधिक हिंदू बंध-भगिनींनी...