छत्रपती संभाजीनगर, 22 मार्च (हिं.स.) : मराठी हिंदू नववर्षानिमित्त पैठण शहरातून शालिवाहन सम्राटाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.पुरातन तिर्थखांबावर मराठी नववर्षाची गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. सातवाहन साम्राज्याची राजधानी असलेल्या पैठणनगरीतून प्रस्थापित केलेल्या कालगणनेनुसारच ‘शालिवाहन शके ‘ हे हिंदू नववर्ष जगभर साजरे केले जाते यंदा ४१ वे वर्ष आहे. शककर्ता शालिवाहन राजाच्या दैदिप्यमान कारकिर्दिचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पैठण येथे मराठी नववर्षाचा जनक पैठण भूमिपुत्र असलेल्या शालिवाहन राजाच्या प्रतिमेसह शालिवाहन शक शुभारंभ शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी पैठण ऐतिहासिक तीर्थखांबावर गुढी उभारून परंपरा जोपासण्यात आली. शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष शेखर पाटील,किशोर चव्हाण,रमेश खांडेकर,सागर पाटील,प्रा.संतोष गव्हाणे,प्रा.संतोष तांबे,शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवनशेठ लोहीया,चेअरमन देवेश ईनामदार,पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जितु परदेशी,दिनेश पारिख,मदन आव्हाड यांच्यासह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply