रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर संस्थेत पुस्तकांची गुढी उभारून सणाचे महत्त्व जपण्यात आले.
संस्थेत वर्षातील सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडतात. यावर्षी गुढीपाडवा हा सणदेखील उत्साहाने पार पडला. या गुढीपाडव्यानिमित्त नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून पुस्तकांची गुढी उभारण्यात आली. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. ते ज्या पुस्तकातून मिळते त्या पुस्तकांना वाचणे, माहिती करून घेणे फार गरजेचे आहे. त्यानिमित्ताने पुस्तकांचा सन्मान व्हावा, यासाठी भारतीय नववर्षाच्या दिनानिमित्त पुस्तकरूपी गुढी उभारण्यात आली. संस्थेतील प्रवेशितांना पुस्तकाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांच्या संकल्पनेने साकारण्यात आला.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply