रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेत पारंपरिक साज करून शेकडो महिला, मुली सहभागी झाल्या होत्या. आपल्या परंपरेचे जतन करणाऱ्या महिलांमधून समीक्षा पाडाळकर, अबोली शेट्ये, माधुरी वाघोले, गौरी देवळे, मधुरा ढेकणे आणि संजना नार्वेकर या ६ गुढीपाडवा तारकांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या कांचन डिजिटल फोटो स्टुडिओतर्फे आणि श्री गणेश वस्त्र निकेतनचे संजू जैन यांनी गुढीपाडवा तारका ही एक अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या, विशेष साजशृंगार केलेल्या सहा तारकांची निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून जान्हवी पाटील, मिताली भिडे, अमृता मायनाक, रोशनी सुर्वे, शिवानी भोळे यांनी काम पाहिले.निवडल्या गेलेल्या सहा जणींना अक्षता जैन, बीना गणेश भिंगार्डे, मधुरा कांचन मालगुंडकर, संगीता शहा, डिंपल गुंदेचा, भारती जैन, कांचन मालगुंडकर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, भैरी देवस्थान ते मारुती मंदिर तसेच पतितपावन मंदिर अशी ही हिंदू स्वागत यात्रा काढण्यात आली. या संपूर्ण स्वागत यात्रेचे नियोजन फोटोग्राफर कांचन मालगुंडकर आणि त्यांच्या टीमने केले होते. या स्वागत यात्रेचे गुढीपाडवा तारका ही स्पर्धा खास आकर्षणाचा विषय ठरली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply