सोलापूर , 22 मार्च (हिं.स.) : गुढी पाडवा अर्थात चैत्र प्रतिपदा हिंदू मराठी नवावर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त पंढरपूरच्या विठुरायाचे मंदिर सजवण्यात आले आहे. मंदीरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. झेंडु, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडु, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, औरकेड अशा विविध फुलांची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. सण-उत्सवानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदीराला वेगवेगळ्या प्रकारे सजवण्यात येते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज विठुरायाचा गाभारा विविधरंगी फुलांनी उठून दिसत आहे. भाविक आज मोठ्या संख्येने विठुरायाच्या चरणी लीण होत असल्याचे पाहायला मिळतात. पंढरपूरसोबतच शिर्डीच्या साईबाबा आणि तुळजापुरच्या देवीच्या मंदीरातही आज भाविक दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर याठिकाणीही आज सुंदर अशी सजावट आणि फुलांची आरास करण्यात आली आहे. या सजावटीसाठी शेवंती 450 किलो, पिंक कन्हेर 40 किलो, अस्तर 40 किलो , झेंडू 100 किलो आणि गुलाब 50 गड्डी वापरण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply