Home Latest Posts खा. नवनीत राणांनी दिल्लीतील निवासस्थानी उभारली गुढी

खा. नवनीत राणांनी दिल्लीतील निवासस्थानी उभारली गुढी

अमरावती, 22 मार्च, (हिं.स.) साडे तीन शुभ मुहूर्ता पैकी एक मुहूर्त आणि मराठी नवीन वर्षाचा दिवस असल्याने राज्यात सध्या गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढत लोक आपला आनंद दाखवत आहेत. असाच उत्साह राज्याबाहेरही पहायला मिळत आहे. चक्क दिल्लीत ही गुढीपाडव्याचा उत्साह दिसत असून खासदारांच्या निवासस्थानी गुढी उभारल्याचे दिसत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या घरी गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यावेळी खासदार राणा यांनी त्यांच्या नवी दिल्लीतील शासकीय निवासस्थानी गुढी उभारली. तसेच खासदार नवनीत राणा यांनी गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करण्याचे टाळले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.