Home Latest Posts कापूराच्या ज्योतीने सावंगा विठोबा झाले प्रकाशमान

कापूराच्या ज्योतीने सावंगा विठोबा झाले प्रकाशमान

अमरावती, 22 मार्च, (हिं.स.) कापूर ज्योती मेघशामा, अरे रामा माहेर होव भाविक भक्ताचं, पहा या सवंगयचं!, सुख जन्म मरण देहीचे, हरतील दुःख, कृष्ण महाराज, धन अवधूताचे, या या कृष्णाची महाराजांच्या ओवीची घुण सांवगा येथे निनादले असुन कापुराच्या ज्योतीने अख्खी सावंगा नगरी आज प्रकाशमय झालेली पहावयास मिळाली.

मागील दोन वर्षांपासून कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे प्रशासनाने राजकीय, धार्मिक व सामाजिक यात्रा उत्सव अशा विविध कार्यक्रमांवर बंदी घातली होती. त्यामुळे आता कोरोनाचे प्रमाण आटोक्यात आल्यामुळे यावर्षी प्रशासनाने धार्मिक, सामाजिक यात्रा उत्सव यांना परवानगी दिली. त्यामुळे यावर्षी सांवगा विठोबा यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार होती. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्त विदर्भाची पंढरपूर समजले जाणारे सावंगा विठोबा येथे दाखल होण्यात मंगळवार पासूनच सुरुवात झाली होती. श्री अवधूत महाराज संस्थान सावंगा विठोबा यांच्या वतीने आणि यात्रा व्यवस्थापक पंचायतसमिती चांदूर रेल्वे यांच्या वतीने यात्रेकरूंच्या सुविधेकरीता नियोजन करण्यात आले होते. यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी चांदूर रेल्वे व अमरावती आगारातून विशेष बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली होती. भाविक भक्तांसाठी संस्थांच्या वतीने प्रसादालय सुरू करण्यात आले असून भाविक भक्तांनी या उत्सवाचा लाभ फायदा घेण्याचे आवाहन संस्थांचे अध्यक्ष वामन रामटेके, सचिव गोविंद राठोड आणि विश्वस्त यांनी केले होते. त्या आवाहनाला सुद्धा भक्तांनी प्रतिसाद दिला. पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके यांन्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.